आचरा (प्रतिनिधी) : सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ, आडवली आणि शिवप्रेमी, यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा 2024 निमित्ताने पोवाडा सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय ( इ. 1 ते 10) गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 5 संघांनी सहभाग घेतला होता. सर्वच सहभागी संघांनी सादर केलेल्या पोवाड्यानी स्पर्धेची चुरस तर वाढवलीच शिवाय ख-या अर्थाने शिवविचारांची उधळण केली. आडवली हायस्कूल च्या कु. ऋतुजा सुरेश मेस्त्री हिने सादर केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांसह परीक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह दाद दिली तसेच तिच्या कौशल्याचे कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षण पांडुरंग नाडगौडा आणि रत्नकांत उदगीरे यांनी केले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी सुभाष साटम, चंद्रदीपक मालंडकर, मोहन लाड, साईनाथ झाडे, तावडे सर, परशुराम गुरव, परिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश भिरवंडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत आर.ए. यादव हायस्कूल आडवली- प्रथम, प्रगत विद्यामंदिर रामगड – द्वितीय, नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुल आचरा – तृतीय तर आर.पी.बागवे हायस्कूल मसुरे व पू.प्रा.शाळा आडवली नं.1 यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश मालंडकर, उपाध्यक्ष तुषार चव्हाण, मिलिंद चव्हाण, रूपेश गुरव, सुबोध चव्हाण, सर्वेश मेस्त्री, प्रणय चव्हाण, छोटू परब, महेश राऊळ, अनिकेत राऊळ, वेदांत लाड, तेजस परब यांनी मेहनत घेतली. सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद चव्हाण यांनी आभार मानले.











