मराठी भाषेतील शिक्षणामुळे, मुलांचे आयुष्य संस्कारक्षम आणि समृद्ध बनते — मुख्या. विजय रासम.

फोंडाघाट हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन संस्मरणीय !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या आयुष्यात इंग्रजीला पर्याय नाही. असं जरी असल, तरी आपली मातृभाषा मराठी मध्येच शिक्षण घेणं अपरिहार्य आहे. प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यामुळे आपले संस्कार, परंपरा यामुळे दीर्घकालीन आयुष्य समृद्ध बनत. कुसुमाग्रजांचे जन्मदिनी आपल्या भाषेचा ‘मराठी भाषा दिन’ आपण साजरा करतो, हे प्रत्येकासाठी भूषणावह आणि ऊर्जा देणारा आहे.असे प्रोत्साहन पर उद्गार फोंडा हायस्कूलचे मुख्या. विजय रासम यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काढले ते मराठी विभाग आयोजित मराठी भाषा दिन सोहळ्यात बोलत होते.

फोंडा हायस्कूल मध्ये “मराठी राज्यभाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. युनिफॉर्मला सुट्टी मिळाल्याने, मराठमोळ्या पोषाखातच विद्यार्थी वृंदांनी शाळेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. सुरुवातीलाच ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रशालेच्या सभागृहात मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मुख्या. श्री विजय रासम यांनी दीप प्रज्वलन करून सरस्वती आणि कुसुमाग्रज यांचे प्रतिमापूजन केले. मान्यवरांची ओळख सौ. वृषाली पवार यांनी करून दिली. आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जोईल यांनी केले. केतन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणारा पोवाडा सादर केला. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यक्ष अध्यापक संघाकडून सहशिक्षिका सौ. संगीता भोगले यांना ” आदर्श मराठी विषय शिक्षक ” पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी मराठी भाषेची कौतुक करणारी मनोगते आपल्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांनी मांडली. त्यानंतर मराठी भाषेचे विविध पदर उलघडून दाखवणारा ‘ मायबोलीचा शृंगार ‘ हा सर्वांग सुंदर कार्यक्रम इयत्ता सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर करून, उपस्थितांना मंत्रमुक्त केले. उपस्थितांचे आभार श्री वाघमोडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे संस्मरणीय आयोजन प्रशालेतील मराठी विभागाच्या सौ. पवार, सौ. भोगले, श्री वाघमोडे, श्री जोईल,श्री नानचे, श्री पोफळे, श्री घुंगरड, इत्यादी सहशिक्षकांनी कलात्मकतेने पार पाडले.कार्यक्रमाचे सुसूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी आर्या खरात व यशस्वी पेडणेकर यांनी केले. ह्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले….

error: Content is protected !!