अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन व्यवस्था

सावंतवाडी (प्रतिनीधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना फाउंडेशन च्या सर्वेसर्वा अर्चना घारे परब मॅडम यांच्या माध्यमातून ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी केंद्रापर्यंत ये जा करण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यास आली .या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर यांनी श्रीफळ वाढवून विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि वाहने मार्गस्थ केली.यावेळी प्रशालेच्या शिक्षिका गवस मॅडम, धोंगडे सर, कर्मचारी मंगेश गावकर आदींसह जयगणेश गावकर, विनायक वरणेकर, निलेश माटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सावंतवाडी तालुक्यातील दहावी विद्यार्थ्यां बरोबर वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील अनेक शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे

यामुळे विद्यार्थी पालक वर्ग ग्रमास्थ यांमधून समाधान व्यक्त करत आभार मानण्यात येत आहेत. अर्चना फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक क्रीडा,सामजिक सांस्कृतीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांसाठी सध्या दहावी परीक्षेसाठी कऱण्यात आलेली वाहन व्यवस्था यामुळें विद्यार्थ्याची चांगली सोय झाली असून पालकांवरील आर्थिक भार हलका झाला असून त्यामुळें विद्यार्थ्यांनाही वेळेत परीक्षा केंद्रा पर्यन्त पोहोचता येणार आहे या उपक्रमाचे शालेय कमिटी शालेय शिक्षकवृंद व कर्मचारी यांसकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. अर्चना घारे परब मॅडम यांनीही जिथं जिथं शक्य असेल तिथं जात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भविष्यातही आपल्या माध्यमातुन मुलांना नेहमी सहकार्य करण्यात येणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

error: Content is protected !!