मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तळगाव शेळवणे वाडीतील कन्या आणि तळगाव श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेली विद्यार्थिनी दीक्षा प्रकाश राणे (वय १४) हिचे मंगळवारी आकस्मिक दुःखद निधन झाले. तिला अल्पसा आजार झाला होता. अत्यंत हुशार, सर्व कार्यक्रमात पुढे असणारी आणि सुंदर हस्ताक्षर ही तिची गुणवैशिष्ट्ये होती. मंगळवारी सकाळी तिने शाळेमध्ये सुद्धा उपस्थिती दर्शविली होती. तिच्या अकस्मात निधनाने गावातील एक होतकरू व विद्यालयाचे भविष्य असलेल्या एका हुशार अभ्यासू विद्यार्थिनीला गमावल्याचे दुःख सर्वत्र व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. तळगाव हितवर्धक संघ, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व कर्मचारी यांच्यावतीने दीक्षा हिच्या आकस्मित निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे.