कणकवली ( प्रतिनिधी) : कणकवली- देवगड- वैभववाडी या विधानसभा मतदार संघात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासकामांसाठी आमदार नितेश राणे साहेब यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ते डांबरीकरणं, स्ट्रीट लाईट व्यवस्था, कब्रस्थान विकास, अशी प्रलंबित असलेली बहुसंख्य विकास कामे या निधीच्या माध्यमातून होणार आहेत. असा भरगोस विकास निधी मिळाल्याने अल्पसंख्यांक समाज अत्यंत समधानी असून आमदार नितेश राणे साहेबांचे शतशः आभार अल्पसंख्यांक नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आरिफभाई बदादादी यांनी व्यक्त केले आहेत.
देवगड मधील अल्पसंख्यांक समाज नेहमीच आमदार नितेश जी राणे व राणे कुटुंबीय यांच्या सदैव पाठीशी राहिला आहे. या अगोदर देखील केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांनी अल्पसंख्यांक समाजाची अनेक विकासकामे करून समाजाला आधार दिला होता. त्याचप्रमाणे आमदार नितेश राणे साहेब हे देखील अल्पसंख्यांक समाजाला विकासकामांसाठी निधी देऊन त्यांना भक्कम आधार देत आहेत. त्यामुळे आमदार राणे साहेब अल्पसंख्यांक समाजासाठी आधारस्तंभ आणि आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी आहोत असे उद्गार समाजातील लोकांकडून व्यक्त केले जात आहेत.
काही समाजकंटकांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केले जातात, समाजामध्ये चुकीची माहिती देऊन लोकांना भ्रमित केले जाते, मात्र अशा अफवा आणि चुकीच्या माहितीला अल्पसंख्यांक समाज कधीही बळी न पडता, या पुढे देखील आमदार राणे साहेब आणि राणे कुटुंबीय यांच्या सोबत राहणार अशी ग्वाही समाजाच्या वतीने दिली जात आहे.आतापर्यंत अल्पसंख्यांक समाजाची दखल फक्त आमदार राणे साहेब आणि राणे कुटुंबीय यांनीच घेतली असून समाजातील विकासकामे देखील राणे साहेबांनीच केली असल्याने अल्पसंख्यांक समाज आताप्रमाणेच यापुढे सुद्धा यांच्या सोबत असणार असा विश्वास मा. आरिफभाई बगदादी आणि समस्त अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने केला जात आहे. आणि पुनःश्च राणे साहेबांचे शतशःआभार.