कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील “लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी कणकवलीतील व्यवसायिक तथा ग्रामोद्योग संस्था.कणकवली व्हाईस चेअरमन शितल सावंत यांचा सत्कार चित्रपट अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महिला समुपदेशन कणकवली च्या रोजा खडपकर व रिया सांगेलकर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर लावण्यसिंधू संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,संचालिका प्रांजल पराडकर,संतोष सावंत,तसेच रोझा खडपक्रर,व रिया सांगेलकर, समुपदेशक,पोलिस स्टेशन कणकवली याउपस्थित होत्या.
जगभरात 8 मार्च रोजी होणारा जागतिक महिला दिन गेली काही वर्षे लावण्यसिंधू संस्थेतर्फे साजरा केला जातो.यानिमित्ताने महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी खास उपस्थित असलेल्या कणकवली पोलिस स्टेशन येथील समुपदेशक रोजा अभय खडपकर व रिया सांगेलकर यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक तंटे स्मुपदेशाद्वारे कसे सोडविले जातात याबाबत मार्गदर्शन केले.
अनेक वर्षे खडतर मेहनत घेऊन मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अक्षता कांबळी या माझ्या मैत्रिणीकडून आपला सत्कार होत असल्याने मला हि कौटुंबिक मायेची थाप मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून सावंत यांनी आपणही महिलांसाठी करीत असलेल्या कार्याची माहिती व्यक्त केली.













