तालुक्यातील चार वस्त्यांना आणला तीस लाखाचा निधी
सावंतवाडी तालुक्यातील तांडा वस्तीसाठीही तीस लाख निधी
कणकवली (प्रतिनिधी) : कै.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत आमदार नितेश राणे यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून आणि सातत्याने पाठपुरावा करून वैभववाडी तालुक्यातील चार विकास कामांना तीस लाख रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून चार गावातील तांडा वस्ती,धनगरवाडी सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडी येथे सौर पथदीप बसविणे साठी 7.50 लाख रुपयांचा निधी तर लोरे नं-02 धनगरवाडी येथे सौर पथदीप बसविणे 7.50 लाख,आचीर्णे गोसावीवाडी येथे सौर पथदीप बसवणे साठी 7.50 लाख रुपये.जांभवडे कोकरेवाडी मध्ये सौर पथदीप बसवणेसाठी 7.50 लाख रुपये. असा निधी मंजूर झाला आहे. वैभववाडी तालुक्यात 30 लाख रुपयांचा निधी या तांडावस्ती योजनेतून सरकारकडून देण्यात आला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातील केशरी येथील संतोष लांबर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता करणे 10 लाख,चौकुळ येथील तांडा वस्तीत जाणारा मुख्य रस्ता ते जळवाडी पर्यंत रस्ता करणे साठी 10 लाख तर याच गावातील पानंदवाडी रस्ता ते वरंदवाडी पर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करण करणेसाठी 10 लाख असा 30 लाखांचा निधी देण्यात आला आहे.