कुडाळ (प्रतिनिधी) : प्रसाद गावडे डॉक्टरेट झाले ! माझे अतिशय जवळचे मित्र प्रसाद गावडे हे डॉक्टरेट झाले याचा मला अतिशय मनस्वी आनंद झाला. प्रसाद गावडे हे गोर गरीब कामगारांसाठी त्यांना लाभ अणि हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने ते झटत असतात कामगार क्षेत्रात त्याचे मोठे योगदान आहे सामाजिक प्रश्नासाठी अणि शासनाचा कारभार गतिमान अणि पारदर्शक होण्यासाठी सुद्धा त्याची सातत्याने धडपडत सुरू असती. भ्रष्ट्राचार निर्मूलन साठी सुद्धा त्याची भूमिका अतिशय आग्रही आहे अणि सर्व सामन्याच्या हितासाठी सातत्याने त्याची धडपड सुरू असती. म्हणुनच काय त्याची अणि माझी अगदी घट्ट मैत्री झाली आहे. प्रसाद गावडे यांच्या मध्ये राजकारणी पेक्षा एक मोठा समाज सेवक लपला आहे, याची अचूक जाणीव मला आहे. म्हणुनच त्याचा कार्याला सलाम करावा असा वाटतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सामाजिक कार्यकर्त्याला कर्नाटक राज्यातील एका नामांकित विद्यापीठाने त्याच्या सामाजिक कार्य क्षेत्रातील सादर केलेल्या प्रबंधसाठी त्यांना डॉक्टरेट पदवी मिळावी ही मात्र मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या भावी आयुष्याला अणि भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !