लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिकक्यासाठी दत्तगुरुना घातले साकडे
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आज वैभववाडी शहरातील दत्त मंदिरात सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी अभिषेक केला. खासदार विनायक राऊत यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त वैभववाडीत दत्तगुरु ना अभिषेक करून राऊत यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. खासदारकी च्या विजयाची हॅट्ट्रिक अडीच लाखांच्या मताधिकक्याने करू दे असे साकडेही दत्तगुरु चरणी घालण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष मंगेश लोके, शहरप्रमुख शिवाजी राणे, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, तसेच रोहन रावराणे, स्वप्नील रावराणे, युवराज रावराणे, विठोजी पाटील आदी उपस्थित होते.














