कणकवली (प्रतिनिधी) : युवा उद्योजक अचित कदम यांनी भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर जात अचित कदम यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवस अभिष्टचिंतन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमताने कुडाळ मालवण मतदारसंघातून आमदार पदी निवड होऊ दे अशा शुभेच्छाही अचित यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिल्या. यावेळी कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, सागर राणे, मंदार मेस्त्री आदी उपस्थित होते.













