कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांना भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर जठार यांनी निलेश राणेंची सदिच्छा भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांच्या शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा जठार यांनी दिल्या. कुडाळ मालवण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण आमदार व्हावेत अशा सदिच्छा सुद्धा जठार यांनी निलेश राणे यांना दिल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, धोंडी चिंदरकर, आप्पा लुडबे, विकी तोरसकर आदी उपस्थित होते.













