आमदार नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासन पुरस्कृत जाणता राजा महानाट्य पाहण्याची मिळणार सुवर्णसंधी

नाधवडे येथे महादेव मंदिराच्या मैदानावर 18 मार्च ते 20 मार्चदरम्यान जाणता राजा महानाट्य होणार सादर

कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेला जाणता राजा महानाट्य मोफत पाहण्याची अनमोल संधी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविणारे शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे महानाट्य 18 ते 20 मार्च दरम्यान कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेला मोफत पाहता येणार आहे. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील महादेव मंदिराच्या मैदानावर सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहाच्या दरम्यान जाणता राजा हे महानाट्य सादर होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून जाणता राजा हे महानाट्य सादर होत आहे. कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यांच्या सीमेवरील नाधवडे या गावात तळेरे- वैभववाडी महामार्गालगत जाणता राजा महानाट्य सादर होणार आहे.या महानाट्य निमित्ताने पुस्तकातून वाचलेला, चित्रपटातून पाहिलेला शिव इतिहास, छत्रपती शिवरायांचा शिवकाळ भव्य अशा रंगमंचावर हजारो कलाकारांच्या कलाकृतीतून प्रत्यक्ष पाहण्याची अनमोल संधी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेला मिळणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत शिवप्रेमी आबालवृद्धांनी जाणता राजा महानाट्य पाहावे असे आवाहन वैभववाडी पं स चे माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!