खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक करणार आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला

एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीची कारवाई

खारेपाटण (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो वाहन क्रमांक – एम एच -४८ बी एम ९६९१ यामधून गोवा बनावटीची बेकायदेशिर दारू वाहतूक करताना तपासात आढलून आला असल्याने आज सोमवारी पहाटे सकाळी ६.३० वाजता खारेपाटण चेक पोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क व एस एस टी पथकाने व खारेपाटण पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.यामध्ये सुमारे २८ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीचे मद्य व ३५ लाख रुपये किमतीची वाहन असा मुद्देमालासह सबंधित वाहन सह जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की,आयशर टेम्पो चालक दिनेश रमेश व्यास राहणार विरार वय – ३९ वर्षे हा आपल्या मालकीचा आयशर टेम्पो वाहन घेऊन गोव्या वरून मुंबईच्या दिशेने चालला असता खारेपाटण चेकपोस्ट येथे येथील तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी उद्धव साबळे यांनी वाहन चालकांचा संशय आल्याने गाडी तपासासाठी थांबविली असता वाहनात बेकायदेशीर गोवा बनावटीची पूर्ण टेम्पो भरलेली दारू बॉटल माल आढळून आला.याबाबत तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग व कणकवली पोलीस याना माहिती देण्यात आली.यावेळी कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व राज्य उत्पादन शुल्क कणकवली निरीक्षक एन एल शिंदे यांनी घटनास्थली तातडीने भेट देऊन कारवाई केली. यावेळी एस एस टी खारेपाटण पथक प्रमुख आर एल शिंदे,कनिष्ठ अभियंता बापू कुंडलिक कुचेकर,एस वी दळवी, वैभव नामदेव घाडगे,खारेपाटण पोलीस नाईक उद्धव साबळे,श्रीम.एस एन कुवेसकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. खारेपाटण चेक पोस्ट येथे करण्यात आलेल्या बेकायदेशीर दारू वाहतूक कारवाईत सदर आयशर टेम्पोत १२५ बॉक्स बिअर बॉटल, रॉयल डब्लू व्हिस्की २५२ बॉक्स, डेनिम -७५० (१९६ बॉक्स),मॅजिक ॲपल २८८० बॉक्स असे मिळून सुमारे १००० एवढ्या दारूच्या बॉटल गाडीत आढलुन आल्या.याबाबत वाहन चालक दिनेश व्यास याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तर याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग करीत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेली सर्वात ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

error: Content is protected !!