अपघाताला निमंत्रण देतायत करुळ घाटातील खड्डे

तातडीने खड्डे बुजविण्याची रफीक नाईक यांची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य महामार्ग म्हणून कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा विजयदुर्ग तरळा कोल्हापूर या मार्गावरील करूळ घाटात सद्या सर्वत्र खड्डे पडले असून यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने करूळ घाटातील रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्यात यावेत.अशी मागणी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांनी केली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासन सार्वजनिक बाधकाम विभाग कार्यालय खारेपाटण वर्ग – २ च्या अख्यारीत येत असलेल्या घाट रस्त्याकडे सद्या प्रशासनाचे पूर्णतहा दुर्लक्ष झाले असून तात्पुरते रस्त्यावरचे खड्डे बुजवून मल्लामट्टी केली जात असल्याचा आरोप देखील रफिक नरक यांनी केला आहे. तरी करूळ घाटातील रस्त्याची तातडीने डागडुजी करून खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!