जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन

रविवार दि.७ रोजी सकाळी ९ वाजता वैभववाडी पोलिस ठाणे येथे आरोग्य व रक्तदान शिबीरास प्रारंभ

वैभववाडी पोलिस ठाणे व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पोलिस ठाणे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी, एस.एस.पी.एम.लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे तसेच राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक -०७-०४-२०२४ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैभववाडीत आरोग्य शिबीर व महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ०७-०४-२०२४ रोजी सकाळी ९ वाजता वैभववाडी पोलिस ठाणे येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, युरोलॉजी तपासणी, अस्थीरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी करण्यात येणार आहेत. तरी वैभववाडी तालुका पंचक्रोशीतील नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा व रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी पोलिस ठाणे व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!