शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका सौ निवेदिता नारकर यांना सेवानिवृत्ती पर “जीवनगौरव पुरस्काराने” सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : चौकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर या त्यांच्या नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, त्यांना सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने “जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग पासून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास आरंभ केला व उर्वरित सेवा चौकुळ इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेजमध्ये केली. मागील 33 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक जिल्हास्तरीय प्रशिक्षण केली. शिवाय बोर्डाच्या मराठी विषयाच्या मॉडरेटर म्हणूनही त्यांनी काम केले. या सत्कार सोहळ्यात शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षक तर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष संजय वेतूरेकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे अभिमानास्पद असल्याची व संघटनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या व त्यांच्या पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सौ नारकर व त्यांचे यजमान नारकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. व या मानाचा सन्मान करत संघटनेसाठी रुपये 5000 ची भरघोस मदत केली व भावी काळातही संघटनेच्या कार्यास हातभार लावण्याची भावना व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, जिल्हा सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर ,संघटना माजी सचिव चौकेकर ,दीपक तारी ,महिला आघाडी सचिव सौ प्रगती आडेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ शारदा गावडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शरद देसाई, विजय ठाकर ,विद्यानंद पिळणकर ,कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार, वाय ए सावंत , एस. ए. कांबळे ,सेगा पाडवी, मेमाने, लोखंडे, अनिकेत वेतुरेकर, अनिल ओतारी, सुनील जाधव, अरुण गवस, प्रेमनाथ गवस, गावडे ,एस एस पाटील यांच्यासह अनेक शिक्षक भारती संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!