सामाईक घराच्या वादातून भाऊ पुतण्याकडून मारहाण

कणकवली (प्रतिनिधी) : सामाईक घराच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी भाऊ प्रभाकर विठोबा तेली व पुतण्या विजय प्रभाकर तेली (रा. जाणवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे फिर्याद रमेश विठोबा तेली (६१, रा. कलमठ स्टेट बँक कॉलिनी तरंदळे रोड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली आहे.

रमेश तेली व प्रभाकर तेली यांच्यात कलमठ स्टेट बँक कॉलिनी येथील सामाईक घरावरून वाद आहेत. प्रभाकर तेली आपल्या कुटुंबासोबत जाणवली येथे राहत असून आपल्या मूळ घरी येऊन जाऊन असायचे. दरम्यान ६ एप्रिल रोजी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास प्रभाकर तेली हे आपल्या सामाईक घरात राहत असलेला भाऊ रमेश तेली यांच्याजवळ आले. येथे येऊन त्यांनी भाऊ रमेश तेली यांना घराच्या विक्रीचे काय झाले असे विचारले. त्यावेळी रमेश म्हणाले विक्रीचे काय ते बघू, घराच्या विक्रीचे एवढ्या लवकर होते का असे म्हणाले. त्याचा प्रभाकर यांना राग आल्याने त्याने फोन करून मुलगा विजय याला बोलून घेतले. विजय तेथे आला त्यावेळी त्याच्या हातात बांबूची काठी होती. विजय याणे रमेश यांच्या उजव्या डोळ्यावर मारले. तसेच त्या पिता पुत्रानी रमेश यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यावेळी रमेश यांची पत्नी श्रद्धा व मुलगा अनिकेत हे वाचवण्यासाठी आले असता त्यांनी त्यांनाही मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!