कणकवली (प्रतिनिधी) : ओटव गावठनवाडी येथील वसंत गंगाराम गावकर (८०) यांनी आजारपणाला कंटाळून गळफास घेतला. ही घटना रविवारी ७ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा सूर्यकांत वसंत गावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
वसंत गावकर यांना घस्याच्या कॅन्सरचा आजार होता. दरम्यान ६ एप्रिल रोजी सर्व कुटुंबीय रात्री जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकांत गावकर हे उटले त्यावेळी वसंत गावकर आपल्या जागेवर दिसून आले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता वसंत गावकर हे घराच्या पाठीमागील पावळीच्या लाकडी वाश्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












