कै.शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त गडमठ येथील रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांचे रक्तदान…!

तळेरे (प्रतिनिधी) : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान समजले जाते. रक्ताची तातडीची गरज अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना सर्वाधिक लागते. तिच गरज ओळखून गडमठ सारख्या ग्रामीण भागात बांदिवडेकर कुटुंबीयांनी हे रक्तदान शिबीर आयोजित केले हा अतिशय खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी निश्चितच मदत होईल. असे उपक्रम सातत्याने समाजात होणे आवश्यक आहेत. अशा उपक्रमांना पोलीस विभागाचे निश्चितच नेहमी सहकार्य लाभले असा विश्वास या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना वैभववाडीचे पोलीस निरीक्षक- सुनील अवसरमोल यांनी व्यक्त केला.

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व विवेकानंद नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै.शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त गडमठ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शंभरहु अधिक ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

या शिबीराचे उद्घाटन वैभववाडीचे पोलीस निरीक्षक- सुनील अवसरमोल, ह्यूमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व कै.शिला शांतनु बांदिवडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष- प्रकाश तेंडुलकर, गडमठ गावच्या सरपंच- मालती शेटे, राजापूर अर्बन बॅंक तळेरे शाखेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, सिंधू मित्र वैभववाडी अध्यक्ष- राजेंद्र पडवळ, ह्यूमन राईटचे जिल्हा सचिव- अर्जुन परब, ह्यूमन राईट संघटनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष- संजय शेळके, उपाध्यक्ष- प्रणय बांदिवडेकर, संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार- संजय खानविलकर, मालवण तालुका अध्यक्ष सुधीर धुरी, कासार्डे गावचे माजी सरपंच संतोष पारकर, आण्णा खाडये,श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, स्पेक्टो मार्टचे संचालक मंगेश चव्हाण, शंतनू बांदिवडेकर, कासार्डे गावच्या माजी सरपंच शारदा आंबेरकर, गौरी आंबेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन वैभववाडी तालुक्याचे उपाध्यक्ष प्रणय बांदिवडेकर यांनी आपल्या मातोश्री कै.शीला शंतनू बांदिवडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गडमठ गावठणवाडी येथे करण्यात आले होते.

तर याप्रसंगी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष- प्रकाश तेंडुलकर म्हणाले की, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या वतीने ज्या ज्या वेळी रुग्णांना तातडीची रक्ताची गरज भासते त्यावेळी ती मोफत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करते.जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात,देशात तसेच देशा बाहेर देखील रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते.सर्वात दुर्मिळ रक्तदात्यांची देखील वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. रक्तदानासारखे पवित्र कार्य नाही. सामाजिक बांधिलकीतून हे कार्य अहोरात्र सुरू आहे. संघटनेचे रक्तदाते स्वखर्चाने रक्ताची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तीची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असतात.

कार्यक्रमांच्या शेवटी कै.शिला शांतनु बांदिवडेकर यांना दोन मिनिटे स्तभत: पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेळके आणि कु.किर्ती आंबेरकर यांनी केले.

error: Content is protected !!