संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन तुळसणकर यांचे केले अभिनंदन
भविष्यात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त एनसीसी कॅडेट तयार करणार – थर्ड ऑफिसर रँक संदेश तुळसणकर
वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संदेश तुळसणकर यांनी नॅशनल कॅडेट कोर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी कामठी नागपूर येथे असोसिएट एनसीसी ऑफिसर चा दीक्षांत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात संदेश तुळसणकर यांना एनसीसी ऑफिसर रँक प्रदान करण्यात आली. ऑफिसर प्रशिक्षण अकॅडमी कामठी येथील चुनीलाल परेड ग्राउंड येथे आयोजित पासिंग आऊट परेड मध्ये संदेश तुळसणकर यांच्या खांद्यावर स्टार लावण्यात आला या दीक्षांत परेडमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील शिक्षक उपस्थित होते भारतातील सर्व राज्यांमधील सर्व प्रशिक्षणार्थी यांनी दोन महिन्यांचे कठोर पी आर सी एन प्रशिक्षण पूर्ण केले यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण ,शारीरिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास ,मॅप रीडिंग ,फायरिंग, ड्रिल, एडवेंचर, विविध खेळ, कॅम्प प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन ,योगा आणि सैनिकी तथा सामाजिक जनजागृती याविषयी प्रशिक्षण देण्यात आले मेजर जनरल राजेशकुमार सचदेवा ॲडिशनल डायरेक्टर जनरल जम्मू-काश्मीर अँन्ड लदाख डायरेक्ट यांनी प्रभावी राष्ट्र उभारण्यासाठी योगदान द्यावे असे सांगितले आणि सर्व असोसिएट एनसीसी ऑफिसर यांनी कॅडेट आणि समाज यांचे रोल मॉडेल म्हणून काम करावे असे सांगितले. साठ दिवसाच्या खडतर प्रशिक्षणातून आज माझे संस्थेने केलेले स्वागत पुढील काळात काम करण्यास ऊर्जा देणारे आहे तसेच भविष्यात माझ्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील देश सेवेसाठी तत्पर ग्रामीण भागातील एनसीसी कॅडेट तयार होतील अशी ग्वाही थर्ड ऑफिसर रँक मिळवून आलेले संदेश तुळसणकर यांनी दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी प्रशालेचे प्राचार्य .बी.एस.नादकर , पर्यवेक्षक पी.एम.पाटील , माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संदेश तुळसणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














