केंद्रीयमंत्री राणें यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मध्यरात्री 12 वाजता ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी पुष्पगुच्छ देत केंद्रीयमंत्री नामदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!