केंद्रीयमंत्री राणें यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 10 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देत केंद्रीयमंत्री नामदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!