केंद्रीयमंत्री राणे यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रेमाची शाल नामदार राणे व नीलम राणे यांच्यावर पांघरत, पुष्पगुच्छ देत केंद्रीयमंत्री नामदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश सावंत, बबलू सावंत, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!