ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण निवळी येथे मूळ तसेच सध्या गोवा राज्यातील शिरसई थीविम येथे राहणाऱ्या संजय शंकर कोदरे (वय ५३) यांचा मृतदेह सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ते गोवा राज्यातील कोलगाव पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता होते.
झाडीत नैसर्गिक विधी करण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी उग्र दुर्गंधी येत असल्याने पाहणी करता संजय कोदरे यांचा मृतदेह फुगलेले व अर्धवट कुजलेला दिसला. त्यानंतर आश्विन अवसरे रेल्वे स्टेशन येथे आले असता त्यांना गोवा पोलीस दिसले. त्यांनी नापत्ताचा फोटो दाखवुन पडताळणी करता अवसरे यांनी सदर मयत इसम हा नापत्ता मधीलच व्यक्ती असल्याचे गोवा पोलीस यांना सांगीतले. त्यानंतर त्यांच्या सोबत आलेला मयत व्यक्तीच्या मुलाने मृतदेह पाहुन ओळख पटवलेली आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आला आहे. या मृतदेहाचा व्हिसेरा प्रिझर्व्ह करण्याबाबत व DNA नमुने काढून देण्याबाबत रिपोर्ट सादर करण्यात आलेला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.











