मालवणात अवैध दारूविक्रीला पोलिसांचा चाप

२ लाख ४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मालवण (प्रतिनिधी) : अवैधरित्या दारू विक्रीवर येथील पोलिसांची धडक कारवाई मागील २० दिवसांमध्ये तालुक्यात १० जणांवर छापे टाकण्यात आले. यात २००० दारूच्या बाटल्या असा सुमारे २ लाख ४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तालुक्यात गोवा बनावटीची दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत छापेमारी सुरू केली. शहरातील धुरीवाडा, दांडी, तारकर्ली, पेंडूर, कोळंब, वायरी याठिकाणचे दारू अड्डे उद्धवस्त केले. यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांच्या धाडसत्रामुळे अनधिकृत दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, संतोष नांदोसकर, एस. एस. खाडे, हेमंत पेडणेकर, विलास टेंबुलकर, सुशांत पवार, प्रकाश पवार, सुभाष शिवगण, वृषाली पाटील, धोंडू जानकर, महादेव घाग्ले यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!