आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी व तोरसोळे उबाठा सेनेचे कार्यकर्ते जगन्नाथ मिराशी माजी देवस्थान समिती चेअरमन, शांताराम पा. मिराशी विकास सोसायटी सदस्य,अनिल विष्णू मिराशी, सतीश अर्जुन कदम, अशोक अनंत सावंत, अनंत शिवराम सावंत यांनी आज शिरगाव येथे संदीप साटम यांच्या वाढदिवस औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमित साटम, संदीप साटम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.













