कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांचा खा.विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी गणपतीपुळे येथे श्री गणेश चरणी विजय संकल्प अभिषेक

कणकवली (प्रतिनिधी) : खा.विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कणकवली तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके युवा सेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे युवासेना विभाग प्रमुख कमलेश नारकर युवा सेना विभाग प्रमुख संदीप गावकर शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश सावंत सतीश परब शिवप्रसाद पेंडुरकर निलेश सावंत मुन्ना तेली आदी शिवसैनिक रत्नागिरी येथे आले होते व अर्ज भरून झाल्यानंतर गणपतीपुळे येथे जाऊन श्री गणेश चरणी विजय संकल्प अभिषेक करून खा. विनायक राऊत यांना अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला.

error: Content is protected !!