राणेंचा पराभव निश्चित म्हणूनच मोदींनी प्रचार सभा घेतली नाही

अतुल रावराणे यांनी चोळले जखमेवर मीठ

कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या पण तळकोकणात सभा घेतली नाही.कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा उमेदवार राणेंचा पराभव हा निश्चित आहे अशा शब्दांत शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी जखमेवर मीठ चोळले. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कणकवली येथील जाहीर सभेवेळी रावराणे बोलत होते. पुढे बोलताना अतुल रावराणे यांनी राणे परिवारावर सडकून टीका केली. सच्च्या मनाच्या उद्योजक किरण सामंत यांनी उमेदवारीच्या बाबतीत केंद्रीयमंत्री असलेल्या नारायण राणेंना घाम फोडला. म्हणूनच तेराव्या यादीपर्यंत उमेदवारी साठी राणेंना वाट बघावी लागली. जेव्हा जेव्हा या मैदानावर उद्धव साहेबानी सभा घेतल्या आहेत त्या त्या वेळी शिवसेनेचा विजय झाला आहे.नितेश राणे स्टंटबाज आमदार आहे. मागील 10 वर्षांत नितेश यांनी केवळ प्रकल्पांची स्टंटबाजी केली. ए जी डॉटर्स चा झिरो वेस्ट प्रकल्प असो, गड नदी पात्रातील रीव्हर राफ्टिंग असो हे सगळे स्टंट केले. विनायक राऊत यांनी 10 वर्षांपुर्वी राणेंचे दहशत संपवली आहे. तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक राऊत करणार आहेत. आता पुन्हा राणेंनी दमबाजी सुरू केली आहे. येत्या 7 मे रोजी राणेंना तिसऱ्यांदा पराभूत करून राणेंचे दहशतीचे पुस्तक कायमचे बंद करूया असे आवाहन रावराणे यांनी केले.

error: Content is protected !!