तळेबाजार येथील दत्तकुमार जोईल वर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी 63 हजार 360 रुपयांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह 7 लाखाची आलिशान कार असा मुद्देमाल जप्त केला. 5 मे रोजी पहाटे साडे पाच वाजता जानवली येथे हॉटेल निलमस कंट्रीसाईड जवळ ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात दत्तप्रसाद नंदकुमार जोईल ( रा. तळेबाजार ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तप्रसाद जोईल हा आपल्या ताब्यातील किया सेलट्रोज कार क्र. MH -07- AG -9648 मधून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करत असताना त्याला कणकवली पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तकुमार जोईल विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ( a ),65 (e ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक माने करत आहेत.