कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांना त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टर चे श्री.रघुनाथ नाईक, श्री. अभिषेक नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेत नाईक यांनी खा. राणे यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन करतानाच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खा. नारायण राणे यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पडवे मेडिकल कॉलेज, पडवे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सह मेडिकल कॉलेज कॅम्पस मधील सर्व इमारतींचे दर्जेदार काम रघुनाथ नाईक, अभिषेक नाईक यांनी केले आहे. तसेच खा. नारायणराव राणे यांच्या एस एस पी एम संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेज, ओम गणेश बंगला, निलम्स कंट्रीसाईड्स हॉटेल सह अन्य इमारतींचे दर्जेदार बांधकामही नाईक यांनीच केले आहे. राणे कुटुंबियांच्या अत्यंत विश्वासातील बांधकाम व्यावसायिक म्हणून नाईक ओळखले जातात.












