नडगिवेच्या नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…

खारेपाटण (प्रतिनिधी) : आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित कणकवली तालुक्यातील नडगिवे गावच्या नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवे मध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष – रघुवीर राणे सर, शाळेचे सचिव – मोहन कावळे, सह सचिव -राजेंद्र ब्रह्मदंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारातून वाजतगाजत बँड पथकासह फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुशोभित करण्यात आले होते. शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!