कलमठ ग्रा पं मध्ये 4 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष कॅम्प

सरपंच संदीप मेस्त्री यांचा पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी बहीण या योजनेसाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पुढाकारातून कलमठ ग्रामपंचायत हॉल मध्ये उत्पन्न दाखल्यांसाठी चार जुलै रोजी विशेष शिबिर होणार आहे. सकाळी 9.30 ते 5 पर्यंत शिबिर होणार आहे. यावेळी तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सेतू मित्र, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य साठी उपस्थित असणार आहेत. कलमठ गावातील सर्व महिला भगिनीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसरपंच स्वप्रील चिंदरकर यानी केले आहे. यावेळी लाभार्थी महिलानी येताना उत्पत्र दाखला साठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट व फोटो घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!