घोणसरी मध्ये कृषीकन्यांमार्फत कृषी दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी कन्या यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत घोणसरी येथे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे . त्याचमुळे राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात घोणसरी ग्रामपंचायत आणि जि. प. केंद्रशाळा घोणसरी क्र.१ यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कृषी कन्यांनी कृषीदिनाचे महत्त्व पटवून दिले. वृक्षदिंडी आणि शाळा तसेच ग्रामपंचायत च्या आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी घोणसरी ग्रामपंचायत सरपंच मॅक्सी पिंटो, उपसरपंच दिप्ती कारेकर, व ग्रामपंचायत सदस्य तसेच जि.प.केंद्रशाळा घोणसरी क्रं १ च्या मुख्याध्यापिका श्रीम. स्वप्नाली बेळणेकर, शिक्षिका श्रीम. संजना शिरसाट, श्रीम.अस्मिता तावडे, . श्रीम. श्रेया नानचे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामध्ये कै. राजाराम मराठे कृषी महाविदयालय फोंडाघाट च्या कृषीकन्या दिप्ती पाटील, दिक्षा कांबळे, श्रीविद्या मांडीपाला, आर्या जंगम, कोमल ताड, साक्षी पाटील, वर्षा मायनमपाटी, हिमाबिंदू मेकाला यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य संते सर, कार्यक्रम समन्वयक मोटे सर, शेलार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!