कणकवली (प्रतिनिधी) : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल कणकवली महाविद्यालायचा डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल २९ जुन रोजी जाहीर झाला. युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथील विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा ९८% निकाल लावून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आपल्या संकेत स्थळावर जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मधील प्रथम वर्षात प्रथम क्रमांक शेलार यज्ञेश (७९.७०%), द्वितीय क्रमांक ताटे पूजा (७८.४०%), तृतीय क्रमांक पांचाळ सिद्धी (७८%), चौथा क्रमांक भोईर श्रेय (७५.३०%), पाचवा क्रमांक आगा असीम (७४.६०%) यांनी पटकावला आहे. तर द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक रायका प्रिती (८०.८२%), द्वितीय क्रमांक शेख शहाबाज (८०.२७%), तृतीय क्रमांक कदम पूनम (८०%), चौथा क्रमांक मुल्ला माहिरा (७९.१८ %), पाचवा क्रमांक घाडी प्रसादि (७८.०९%) यांनी पटकावला आहे. दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार वैभवजी नाईक यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सचिव रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त मंदार सावंत, मेधा बाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य अरविंदेकर, चंद्रशेखर बाबर, अमर कुलकर्णी तसेच महाविद्यालयाच्या डी. फार्मसी परीक्षा विभागाचे प्रमुख नमिता सागवेकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.













