सोनू सावंत मित्रमंडळातर्फे वरवडेत भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकासाठी १० हजारांचे पारितोषिक

वरवडे (प्रतिनिधी) : दीपावलीच्या उत्साहात नरकासुर स्पर्धांची रंगत वाढविण्यासाठी कणकवली पंचायत समितीचे उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या सोनू सावंत मित्रमंडळ, वरवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फणसवाडी, वरवडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ पार पडणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांना आकर्षक रोख पारितोषिके आणि चषक जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मंडळाला १० हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये रोख व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला प्रोत्साहनपर १ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.

नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक मंडळांना आपली कलात्मकता, सर्जनशीलता आणि कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला परिसरातील मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मंडळांनी अधिक माहितीसाठी केतन घाडीगांवकर मोबा. ९२८४८७८५३१, अनिल घाडीगांवकर मोबा. ८८३००९६९०० , हनुमंत बोंद्रे मोबा. ९४२२५६२५९९ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!