नेत्रतपासणी व रक्त तपासणी चा नागरिकांनी घेतला लाभ
कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वैद्यकीय सेल यांच्यावतीने कुडाळ येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष रुपेश जाधव, वैद्यकीय सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विकास मंगल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, वैद्यकीय सेल जिल्हा उपाध्यक्ष अँथनी फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीसॲरिस्टर ब्रिटो, जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, शभा खान,अपर्णा पवार, अविनाश राणे व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते यावेळी नेत्र तपासणी शिबिर व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला












