वैभववाडी व्यापारी संघटनेने तहसीलदार यांना दिले निवेदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या वैभववाडी कोल्हापूर वाहतूक करुळ घाट बंद असल्याने भुईबावडा घाट मार्गाने सुरू आहे. या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतुक सध्या राजरोस पणे सुरू आहे त्यामुळे येत्या काळात हा घाट मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोक्यात येऊ शकतो तरी त्या मार्गाने सुरू ओव्हरलोड वाहतूक फोंडा मार्गे वळवून गणेश चतुर्थी पुर्वी करुळ घाट वाहतुकीस सुरू करावा. व्यापारी वर्गाचे यामुळे खूप नुकसान होत आहे . या आशयाचे निवेदन आज वैभववाडी तहसीलदार यांना व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर अरविंद गाड,सुरेंद्र नारकर,नितेश पाटील,संजय लोके,वसंत पटेल,बाळु शिरावडेकर आदी व्यापारी उपस्थित होते.











