भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे. तर काही ठिकाणी साईड पट्टीला भेगा गेल्या आहेत. करूळ घाट मार्ग बंद असल्यामुळे तालुक्याची वाहतूकीची संपूर्ण मदार असलेला भुईबावडा घाट बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भुईबावडा घाटात यावर्षी मोठा निधी खर्च करून संरक्षक भिंती, पक्क्या साईड पट्ट्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत घाट वाहतूकीसाठी सज्ज झाला होता. करूळ घाट मार्ग नूतनीकरणच्या कामासाठी जानेवारी पासून बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा यांना जोडणारा भुईबावडा घाटावर संपूर्ण वाहतूकीची मदार आहे. मात्र दोन दिवसापूर्वी घाटातील नवीन बांधलेली संरक्षक भिंत कोसली आहे. तर अनेक ठिकाणी साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबात शंका व्यक्त केली जात आहे.

करूळ घाट बंद असल्यामुळे सगळी वाहतूक ही भुईबावडा घाटातून केली जात आहे. भुईबावडा घाटातून अति अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी तशीलादरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. घाटातून अति अवजड वाहतूक सुरु राहिल्यास घाटातील साईड पट्ट्या खचून संपूर्ण वाहतूकच बंद होण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. तसेच वैभववाडी उंबर्डे, व उंबर्डे भुईबावडा मार्गांवर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी साईड पट्टी खचली आहे. त्यामुळे या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!