वैभववाडी रेल्वे स्थानक, बस स्थानक सुसज्ज करा

डीपीडिसी सभेत सदस्य सुधीर नकाशे यांनी वेधले लक्ष

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी जि.प. सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुधीर नकाशे यांनी वैभववाडी रेल्वे स्थानक व वैभववाडी बस स्थानकातील समस्यांकडे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले.रेल्वे स्टेशन व बस स्थानक सुसज्ज करावी.अशी मागणी  केली आहे.

वैभववाडी स्टेशन हे वैभववाडी तालुक्याबरोबरच कणकवली, राजापूर, गगनबावडा तालुक्यातील प्रवाशांसाठी सोईचे रेल्वे स्टेशन असून या स्टेशनवरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र हे रेल्वे स्टेशन अनेक समस्याच्या विळख्यात अडकले आहे. याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, रेल्वे स्टेशनप्रमाणे वैभववाडी रेल्वे स्टेशनचा विकास करावा.अशी मागणी नकाशे यांनी केली

त्याचप्रमाणे वैभववाडी बस स्थानक सुसज्ज करावे. पिण्याचे पाणी, शौचालय, बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करणे करणे आवश्यक आहे. दररोज हजारो प्रवासी बस स्थानकात येते असतात. मात्र याठिकाणी प्रवाशांना नीट उभे राहताही येते नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दोन्ही प्रश्न जिल्हा नियोजन सभेत मांडून नकाशे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. पालकमंत्री आता तरी लक्ष देऊन या समस्या मार्गी लावतील अशी अपेक्षा तालुकावाशियांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!