श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचा उपक्रम
वार्षिक सर्वसाधारण सभेत 1 ऑगस्टला होणार वितरण
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराने गुरुवार दि.1 ऑगस्ट रोजी दु. ठिक. 3 वाजता संस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सभेत संस्थेच्या कामकाजा बरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही आयोजित केलेला आहे. इ 10 वी 12 वीत प्रथम व द्वितीय क्रमांक यांना जयप्रकाश (बाबू) परुळेकर, उर्मिला सांबारी, सौ उज्वला सरजोशी यांजकडून रोख रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत. शिष्यवृत्ती मिळविलेले विद्यार्थी, सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभीजीत जोशी यांजकडून तसेच 10 वी मराठी माध्यमातील उत्तीर्ण विद्यार्थी मधील, संस्कृत, गणित व शास्त्र या विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्मी कानविंदे रा-पुणे यांजकडून रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहे.
अँड. उर्मिला मारुती आचरेकर यांजकडून कै. मारुती आचरेकर स्मरणार्थ “चोखंदळ वाचक पुरस्कार 2024” यासाठी बालवाचक चिन्मयी सुहास पेंदुरकर व वेदांगी नरेश पुजारे यांची निवड झालेली असून त्यांनाही याच वेळी गौरविण्यात येणार आहे. सर्व वाचन प्रेमीं, संस्था सभासद यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे व कार्यवाह अर्जुन (दादा) बापर्डेकर व संस्थेची सर्व कार्यकारीणी सभासद यांनी केली आहे.