त्रिंबक गावचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक गावचे माजी सरपंच तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागेश सिताराम सकपाळ यांच नुकतेच त्रिंबक बागवेवाडी येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्रिंबक बागवेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, बहिणी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्रिंबक पोलिस पाटील सिताराम उर्फ बाबू सकपाळ यांचे ते वडील तर निवृत्त गुन्हा अन्वेषण विभाग अधिकारी सुरेंद्र सकपाळ यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!