न्यु कॉलेज महाविद्यालयातील नशीले अड्डे -ओपन बार, यांच्या विरोधात युवा सेना कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे ॲक्शन मोडवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या मुख्य वस्तीत असणाऱ्या शिवाजी पेठेतील न्यु कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या महाविदयालयाच्या पटांगणात रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या चालतात. या ठिकाणी अनेक तरुण रात्रीच्या वेळी दारू, गांजा, सिगारेट याची नशा करत बसलेले असतात. यामुळे पटांगणात दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय. यामुळं संस्थेची आणि परिसराची बदनामी होतेय. परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. त्यामुळं रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या करणाऱ्यांवर महाविदयालय प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं कारवाई करावी, यासाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं प्राचार्य व्ही एम पाटील यांची भेट घेतली. यावेळी मागणीचं निवेदन प्राचार्य पाटील यांना देण्यात आलं. पाटील यांनी भविष्यात असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. शिष्टमंडळात युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनजीत माने, अक्षय घाटगे, सदाशिव पवार , कीर्ती कुमार, जाधव, अभि दाभाडे, शुभम पाटील, सिद्धेश नाईक, श्रीनंद वडर, लतीफ शेख, सानिका दामगुडे, माधुरी जाधव, प्रिया माने, समृद्धी गुरव, अक्षय मोरे आदिंचा समावेश होता.

error: Content is protected !!