राज्य स्तरीय ‘ॲबॅकस आणि वैदिक गणित ‘ स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा प्रथम मानांकित सायकलची विजेती
चौके (प्रतिनिधी) : ५ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूश्री एज्युकेशन ॲकॅडमी आयोजित ‘ॲबॅकस आणि वैदिक गणित ‘ स्पर्धेत पोईप गावातील जि. प. केंद्र शाळा नं – १ मधील विद्यार्थीनी कुमारी हार्दिका राजाराम पाटकर GK3 level च्या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सायकलची प्रथम मानकरी ठरली. तसेच यापूर्वी कुडाळ येथे पार पडलेल्या 16/06/2024 रोजी राज्यस्तरीय गुरूश्री एज्युकेशन ॲकाडमी आयोजित ‘ॲबॅकस आणि वैदिक गणित ‘ स्पर्धेत GK2 level स्पर्धेत सुद्धा प्रथम मानांकित सायकल विजेती ठरली होती. यासाठी तिला गुरुश्रीॲबॅकस चे संस्थापक अविनाश भिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . केंद्र शाळा पोईपचे मुख्याध्यापक घाडीगांवकर सर, पाटील सर,शाळेतील इतर शिक्षक., पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.













