संध्याकाळ पर्यंत राधानगरी धरण 94. 00 टक्के भरल्याची नोंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढत्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीयत. आज संध्याकाळी राधानगरी धरण 94. 00 टक्के भरल्याची नोंद झाली. धरण क्षेत्रातील वाढत्या पावसामुळे राधानगरी धरणाची वाटचाल 100 टक्के भरण्याकडे सुरु झाली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने सर्तक राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

error: Content is protected !!