कोळपे पंचायत समिती च्या गाव दौरा बैठका संपन्न

विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती

युवासेना कोळपे विभागप्रमुख पदी राजेश पवार यांची नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवा सप्ताहा च्या निमित्ताने कोळपे पंचायत समिती मध्ये गाव दौरा बैठका संपन्न झाल्या यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये कोळपे पंचायत समिती मधील वेंगसर, मांगवली, तिथवली, दिगशी, तिरवडे या गावात बैठका घेण्यात आल्या. यावेळी कोळपे युवासेना विभागप्रमुख पदी राजेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले, भगवा सप्ताह च्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी सज्ज होऊया, व प्रत्येक घरा- घरात मशाल चिन्ह पोहचवण्यासाठी आपण एक जुटीने काम करूया.येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता ही येणार आहे, प्रत्येक गावात ज्या त्रुटी असतील ते आम्ही पूर्ण करूण गावची विकासकामे मार्गी लावूया.युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, भगवा सप्ताह च्या निमित्ताने आपण गावा-गावात प्रचार कमेटी स्थापन करूया, झालेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रभाव या विधानसभेला भगवा फडकवून पुन्हा सज्ज होऊया.

यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी,कोळपे सरपंच सुनील कांबळे, समीर लांजेकर, विश्व्जीत माने, दिलीप कांबळे, करीम इसब, शाबान राऊत, विलास माने, बरकत भेरी, विलास पावसकर,नंदकुमार खेडेकर, दामोदर नार्वेकर, आत्माराम गोठणकर, प्रमोद नार्वेकर, शांताराम खाडे, सचिन आयरे, प्रवीण राणे, वसंत नाटेकर, अभिषेक गवाणकर, मधुकर आयरे, प्रभाकर गवाणकर,मंगेश कोलते, नवनाथ गुरव, सतीश गांगण, सुभाष गांगण, प्रकाश गवाणकर,साहिल गुरव, अमर गुरव, गुलझर काझी, जयराम हरयान, नाना जैतापकर, प्रमोद काडगे, चित्रा हरयाण, राजेश पवार, देवेंद्र पाष्टे, नरेंद्र गोरुले, जितेंद्र तळेकर, सुहास गुरव, प्रवीण पवार, प्रवीण धुगरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!