शिवसेना शाखा खांबाळे च्या तीने १० मार्च रोजी छ.शिवाजी महाराज जयंती उत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना शाखा खांबाळे च्या वतीने 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १०.०० वा. दीपप्रज्वलन व शिवप्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ सुनिल राघो पवार यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे.

सायंकाळी ५.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सादर करण्यात येणार आहे. गावातील सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके,खांबाळे सरपंच गौरी पवार,उपसरपंच गणेश पवार, माजी विभागप्रमुख सुनील पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.

error: Content is protected !!