शशिकांत इंगळे मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनीधी) : माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 15 मार्च रोजी शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने सकाळी 10 वाजता कणकवली येथील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली कॉलेज रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी शशिकांत इंगळे मोबा.8408080060 येथे संपर्क साधावा.













