सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) : शनिवार दिनांक ४ मार्च व रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. माध्यमिक गटात सौ. मिताली महेंद्र तांबे , भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई यांनी सादर केलेल्या ‘कोरोनाची बंदी, आम्ही केली सुवर्णसंधी’ या नवोपक्रमाला स्टेट इनोव्हेशन ऍड रिसर्च फाउंडेशन सोलापूर, महाराष्ट्र यांनी नॅशनल एज्युकेशनल इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित केले.
या कार्यक्रमास डॉ. दिपक माळी (एमएससीईआरटी पुणे), डॉ. किरण घांडे (यशदा पुणे), पद्मश्री गिरीश प्रभुणे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू, मा. प्रदीप मोरे (माजी शिक्षण उपसंचालक पुणे), मा.दत्तात्रय वारे (प्रयोगशील शिक्षक), डॉ. ह. ना. जगताप ( प्रसिद्ध शिक्षण तज्ञ ), मा. भाऊसाहेब चासकर, डॉ. सुहासिनी शहा (प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर) तसेच सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक मा.बाळासाहेब वाघ, मा. सिद्धाराम माशाळे, मा. राजकिरण चव्हाण, मा. हेमा वाघ, मा. अनघा जहागिरदार उपस्थित होते. देशभरातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांतून नवोपक्रमशील शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सौ. मिताली महेंद्र तांबे यांनी सर फाऊंडेशन नॅशनल टिचर इनोव्हेशन अवॉर्ड सलग तिसऱ्यांदा मिळवून विजयाची हॅटट्रिक केली आहे.