कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता इंडियन एअर फोर्स मधील करिअरच्या संधी या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विंग कमांडर रवी सचिन कमांडिंग ऑफिसर सिक्स सिलेक्शन सेंटर उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या सेमिनारसाठी उपस्थित राहून या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एकनाथ मांजरेकर तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. डी एस बाडकर व श्री. गणेश चिमणकर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे इंडियन एअर फोर्स मधील करिअर च्या संधी या विषयावर 25 राेजी सेमिनारचे आयोजन












