नवजीवन : महिलांसाठी आरोग्य प्रकल्प, धुळे तर्फे कॅन्सर विषयक आरोग्य जनजागृती सत्र मोराणेत संपन्न

डाँ.बाबासाहेब आंबेडकर काँलेज आँफ सोशल वर्क -मोराणे येथे जनजागृती सत्राचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व आरोग्य प्रकल्प, धुळे’ तर्फे मोराणे येथे महिलांसाठी कँन्सर विषयक जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयात हे सत्र नुकतेच संपन्न झाले.नवजीवन प्रकल्पात सहभागी असलेल्या मोराणे व कुंडाणे गावातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

धुळे तालुक्यातील मोराणे व कुंडाणे गावात प्रामुख्याने कुपोषणाने ग्रासलेल्या आदिवासी महिलांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी समता शिक्षण संस्थेचे सचिव व प्रकल्प संचालक डाँ.जालिंदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनानुसार नवजीवनः महिलांसाठी आरोग्य प्रकल्पाचे माध्यमातून जनजागृती सह प्रकल्प कार्य सुरू आहे. जनजागृती सत्रामधील विषय “कॅन्सर : कारणे, प्रतिबंध व उपाययोजना” या विषयावर धुळे येथील स्रीरोग तज्ञ डाँ. आराधना भामरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.रघुनाथ महाजन उपस्थित होते.

डॉ.आराधना यांनी उपस्थित महिलांना त्यांना समजेल अशा भाषेत प्रथमत: कॅन्सर चे प्रकार व त्यांची लक्षणेही महिलांना सांगितली. सर्वाइकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्यारीयन कॅन्सर काय असतो, त्याची लक्षणे कोणती असतात. त्यांना प्रायमरी स्टेजला कसे ओळखता येते. याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी महिलांना या रोगाबद्दल आपण स्वतः कसे सतर्क असले पाहिजे व कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या वेळेला आपण वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, याची सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण महिला या स्वतःच्या आरोग्याबाबत काळजी घेत नसतात. स्वतःच्या आरोग्याला त्या नेहमी दुय्यम स्थान देतात. हे समजून घेवून डाँ.आराधना यांनी त्यांना स्वतः आपली काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले. याप्रसंगी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाआधारे मार्गदर्शन केले.सदर जनजागृती सत्रास मोराणे उपनगर येथील भिल्ल वस्ती आणि कुंडाणे विश्वासनगर (आदिवासी वस्ती) येथील प्रकल्पातील १८ ते ४० वयोगटातील ३५ महिला उपस्थीत होत्या.

डाँ.बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास प्रकल्प समन्वयक प्रा.रचना अडसुळे यांचे जनजागृती सत्र संयोजनात प्रमुख मार्गदर्शन राहिले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. तर कार्यक्रम संयोजनात कार्यक्रम अधिकारी गणेश उफाडे, सुभाष बागुल व क्षेत्रकर्याचे विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!